पूर्णानगर येथे आंबा महोत्सव   

पिंपरी : स्वराज्य स्वयंरोजगार संस्था व जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडांगण, पूर्णा नगर  येथे हापुस आंबा महोत्सवाचे उद्घाटन झाले. महोत्सवाची सुरुवात ही लहान मुलांना मोफत ओरिजनल हापूस आंबे खायला देऊन स्पर्धा घेऊन करण्यात आली, लहान मुलांनी हापूस आंब्यावर यथेच्य ताव मारला.
 
या महोत्सवामध्ये कोकणातील नैसर्गिकरित्या पिकवलेला ओरिजनल देवगड व रत्नागिरी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला आहे, त्याचप्रमाणे काजू, कोकम, सोलकढी कैरी पन्हं, उकडीचे मोदक, आंबोळी, घावणे, चटणी, पुरणपोळी,आमरस पुरी, दाल पकवान, कच्ची दाबेली पॅटीस असे विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत, लहान मुलांकरिता खेळणी ही उपलब्ध आहेत,आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, रविवार  सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे, आंबा विक्री सकाळी आठ वाजल्यापासून सुरू राहणार आहे.

Related Articles